Senior cricketer Kapil Dev
क्रीडा

ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती मिळाली आहे. दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांची अ‍ॅंजिआोप्लास्टी झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. कपिल देव हे भारताच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून, त्यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला.