मुंबई : महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत असणाऱ्या लता बन्सोले या मूळच्या अमळनेरकर आहेत. या रणरागिणीने आपल्या जीवाची पर्वा न करता लोकलसमोर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लता बन्सोले यांना मंत्रालयात बोलावून त्यांचा विशेष सत्कार केला. गुलाबराव पाटील यांनी लता बन्सोले यांच्या धाडसाचे कौतुक केले. […]

