सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. विठ्ठलाचे नामस्मरण करत ही दिंडी पायी पंढरपूरकडे रवाना झालेली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी या गावातील रहिवासी या दिंडीमध्ये होते. […]

