नवी दिल्ली : प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीकरिता साहित्य अकादमी पुरस्कार तर प्रमोद मुजुमदार यांना ‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या […]

