नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात रोखण्यात आले आहे. कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून खाते रोखण्यात आल्याचे ट्विटर हँडल दर्शवत आहे. मात्र, पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर कारवाई कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

