पुणे : पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरने आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पेट घेतला. पुण्यातील पिंपरी येथील डीवाय पाटील इन्स्टिट्यूटला लागून असलेल्या पार्किंग एरियाजवळ ही धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास मदत केली. त्यांनी वेळीच […]

