President Draupadi Murmu
देश

द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ, असा असेल शपथविधी सोहळा

नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (25 जुलै) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा (CJI NV Ramana) त्यांना १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ देतील. त्यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. शपथ घेतल्यानंतर नव्या राष्ट्रपती देशाला संबोधित करतील. […]