पुणे : बाणेर येथील ऋतुरंग पार्क सोसायटीच्या आवारात झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना २७ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात ठेकेदार व सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लहू गुलाब क्षीरसागर (वय ६६, रा. इंगवले चौक, […]

