पुणे : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी कोळसा घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला आहे. हा अपघात सकाळी दहाच्या सुमारास घडला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान, नवले पूल आणि भूमकर चौक दरम्यानच्या उतारावरून जात असताना ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो दुभाजकावर आदळला. ट्रक बेंगळुरूकडे जात असताना रस्त्यावर आडवा झाला […]

