अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी […]
टॅग: Natural Disaster
सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]
गावागावात हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ
मुंबई : केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठी, तसेच शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषिविषयक सल्ला व […]
कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी […]




