mumbai cp hemant nagrale orders, medical report should not be sought from those who come to lodge a complaint in case of injury
महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केला आदेश, जखमी व्यक्ती तक्रार दाखल करण्यासाठी आल्यास…

मुंबई : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी केला आहे. त्यानुसार, जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्यांविषयी संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा असे सांगितले आहे. आयुक्तांनी सर्व पोलिसांना निर्देश दिले आहेत की, जखमी व्यक्तीकडे प्रथम वैद्यकीय अहवाल (medical report) न मागता त्यांना लवकरात लवकर उपचार कसा मिळेल याला प्राधान्य द्यावे. […]