मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक राज्यात मोठ्या संख्येने यावेत, यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा सुरोस्तव यांच्याशी चर्चा केली. मंत्रालयातील दालनात रशियाचे महावाणिज्य दूत व त्यांचे शिष्टमंडळ यांनी मंत्री लोढा यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. […]

