The committee is committed to the overall development of women and children – Women and Children's Rights and Welfare Committee Head Monika Rajale
महाराष्ट्र मुंबई

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध – महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती प्रमुख मोनिका राजळे

मुंबई : समस्याग्रस्त व गरजू महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे समितीच्या प्रमुख तथा आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. महिला व बालकांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि पुनर्वसनसंदर्भात योग्य सुविधा देण्यात येत असून, अधिक परिणामकारक व दीर्घकाळ उपाययोजना राबविण्यासाठी शासनास योग्य शिफारसी करण्यात येतील, […]