मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएनं आज पहाटे शर्मा यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक करण्यात आले आहे. आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी पहाटे एनआयएच्या टीमने धाड टाकली होती. […]
टॅग: Mansukh Hiren case
हे राज्य सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती
मुंबई : सचिन वाझे यांच्यावरील कारवाईनंतर राजकारणात देखील त्याचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ‘हिरेन प्रकरणातील गुप्त माहिती सगळ्यात आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मिळाली, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत,’ असंदेखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. […]
सचिन वाझे यांना NIA कडून अटक
मुंबई : सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी NIA कडून सचिन वाझे यांची शनिवारी कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सकाळी ११.३० वाजल्यापासून तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अखेर त्यांना रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक करण्यात आली. NIA ने […]



