मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींना गती देणारा हा मार्ग आता ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नव्या उंचीवर पोहोचत आहे. केवळ वाहतूक सुलभ करण्यापुरता मर्यादित न राहता, हा प्रकल्प राज्याच्या व्यापक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा हा महामार्ग दररोज हजारो वाहनांची वाहतूक […]
टॅग: Maharashtra Infrastructure
गडकरी यांनी केली दुसऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेची घोषणा, पुण्यासाठी ५०,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा समावेश
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी मोठ्या पायाभूत सुविधा पॅकेजची घोषणा केली असून, त्यामध्ये दुसरा मुंबई–पुणे एक्सप्रेसवे आणि पुणे जिल्ह्यासाठी सुमारे ₹५०,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री गडकरी यांनी सांगितले की, येणाऱ्या वर्षासाठी राज्यभरात एकूण ₹१.५ लाख कोटींचे रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आले […]
हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या उपमार्गिकांना शासनाची मान्यता
मुंबई : पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार […]
तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
मुंबई : तळेगाव –चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (माजी राज्य महामार्ग ५५) कि.मी. ०/०० ते कि.मी. ५४/०० या मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ₹५९.७५ कोटी निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. तसेच या निर्णयामुळे तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला मोठा […]
धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी तांत्रिक, आर्थिक व लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार्यता तपासावी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हब उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत […]
समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण […]






