महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे […]
टॅग: Maharashtra Assembly Elections
वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक आयोगाला तीन गंभीर प्रश्न: महाराष्ट्र निवडणूक प्रक्रियेवर शंका
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला असून सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७५ लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती दिली होती. तसेच, काही ठिकाणी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याचेही सांगण्यात आले. या आकडेवारीवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. […]


