ठाणे : ठाण्यातील कळवा पूर्वेतील इंदिरा नगरमधील माँ काली चाळ येथे शनिवारी रात्री भूस्खलन झाल्यामुळे सहा घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी, आरडीएमसी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आजूबाजूच्या घरांतील रहिवाशांना आरडीएमसी टीम आणि अग्निशमन […]

