मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले. चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशीचा तपशील सांगितला तसंच सरकारचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप केला. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी सगळी उत्तरं दिली. पोलिसांनी […]

