Pune Police Constable Seema Valvi's bravery saved the life of a youth from Koyta Gang
पुणे महाराष्ट्र

अभिमानास्पद! पुणे पोलीस कॉन्स्टेबल सीमा वळवी यांच्या धाडसामुळे कोयता गँगपासून वाचले तरुणाचे प्राण

पुणे : चंदन नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस कॉन्स्टेबल सीमा वळवी यांनी उल्लेखनीय शौर्याचे प्रदर्शन केले आहे. सीमा वळवी यांनी कोयता गॅंगच्या सशस्त्र हल्लेखोरांचा सामना करून तरुणावरील संभाव्य जीवघेणा हल्ला हाणून पाडला. वळवी यांच्या धाडसी हस्तक्षेपामुळे तरुणाचा जीव वाचला. 24 डिसेंबरच्या रात्री, कॉन्स्टेबल सीमा वळवी या ड्युटी पूर्ण करून घरी जात असताना वडगावशेरीतील आनंद पार्क रोडवर […]