मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्यपदकासाठी तीन कोटी, कांस्यपदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास, तीस व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. […]

