Home voting of 1922 senior citizens and 187 disabled voters above 85 years of age in Mumbai city district
महाराष्ट्र मुंबई

मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. […]