मल्याळी चित्रपटांच्या चित्रीकरण सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे लावून अभिनेत्रींचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी शनिवारी केला. तसेच, पुरुष कलाकार असे व्हिडीओ त्यांच्या मोबाइलवर पाहत असताना आपण स्वत: पाहिले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मल्याळी चित्रपटसृष्टीत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाशी संबंधित न्या. के. हेमा समितीचा अहवाल […]

