पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर येथील रामटेकडी जवळील ओव्हर ब्रिजवर शुक्रवारी भरधाव वेगाने येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसने एका मोटारसायकलस्वाराला चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला. यामध्ये, कालूराम नंदकुमार जाधव (५०) हे मोटारसायकलवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या राज्य परिवहन बसने त्यांना […]

