नागपूर : काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यात सुरु झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इंजेक्शनचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकार्यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे इंजेक्शन तयार होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असं जेनेटिक लाईफ सायन्सेसचे संचालक डॉ. क्षीरसागर यांनी […]

