Maharashtra Government to Enforce Gutkha Ban with MCOCA in 2026 – Legal Amendments Ahead
महाराष्ट्र मुंबई

गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षात मकोका लागणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई : राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षात गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व […]

नागपूर महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाच्या सुसज्ज इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाच्या सिव्हील लाईन येथील सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग […]

food and drug administration
महाराष्ट्र

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई

मुंबई : सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येईल. ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा उत्पादकांकडे कायद्यातील […]

food and drug administration
महाराष्ट्र मुंबई

गर्भपाताच्या औषधाची ऑनलाईन विक्री करणाऱ्या amazon विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. या ऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रिस्क्रीप्शन MTP kit या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. ॲमेझॉन (amazon.in) या ऑनलाईन पोर्टल वर A-Kare या ब्रँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले होते. […]

food and drug administration
महाराष्ट्र मुंबई

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

मुंबई : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने दिले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने स्थानिक पातळीवर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पाहणी करण्यात आली. यानंतर सुनावणी घेण्यात येऊन त्रुटी आढळल्यानुसार हे आदेश बजावण्यात आले […]

Food and Drug Administration (FDA) is keeping a close eye on adulterated products
महाराष्ट्र

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर, कडक कारवाईचे निर्देश

मुंबई : सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या […]

adulterated edible oil
इतर महाराष्ट्र मुंबई

मुंबईत निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त; खाद्य तेल खरेदी करताना सावधानता बाळगावी – एफडीए

मुंबई : अन्न आणि औषध विभाग मार्फत मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने खाद्य तेल खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून वारंवार विविध दुकानांवर […]