पुणे : पुण्यात सातववाडी भागात दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यामुळे बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पुणे सासवड रोडवर सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला. तर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (१९ जुलै) सकाळी सातच्या सुमारास सातववाडी येथील ग्लायडिंग सेंटर समोर झाला. […]

