जालना : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. अंबडपासून १० किमीवर वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून १४ जण जखमी झाले आहेत. गेवराईहून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती होती की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे. […]

