Konkan Railway Services Disrupted As Engine Derails
महाराष्ट्र

कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरले

सिंधुदुर्ग : राजधानी एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरून कोकण रेल्वे मार्गावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगद्यामध्ये आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त हजरत निजामुद्दीन-मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल रेल्वे गोव्याच्या दिशेने जात होती. मुंबईपासून सुमारे ३२५ किलोमीटरवर असलेल्या करबुडे बोगद्यातील ट्रॅकवर […]