नगरपालिकेतील ठेकेदाराविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या समोरच स्वतःला पेटवून घेतले. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भोरे हे सतत तक्रार करत होते. आठ दिवसांपूर्वी एका घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेत असताना […]

