पुणे : पुणे शहरातील भोसरी परिसरात मंगळवारी पीएमपीएमएल बसने दिलेल्या धडकेत एका 26 वर्षीय पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मृताच्या नातेवाईकाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी पीएमपीएमएल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगद अच्छेलाल तुर्हा (२६, रा. गोपाळगंज, बिहार) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो भोसरी येथील पुणे-नाशिक महामार्गावरून चालला असताना त्याला भरधाव […]

