मुंबई : पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेक्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा […]
टॅग: Deputy Chief Minister Devendra Fadnavis
क्रीडा विभागाच्या मोबाईल ऍपमुळे पारदर्शक कामास चालना मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : क्रीडा विभागाच्या मोबाईल ॲपमुळे खेळाडू व क्रीडा संस्था, मार्गदर्शक व पालकांना विभागामार्फत राबविले जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मिळेल. त्यासोबतच क्रीडा विभागाच्या कामात पारदर्शकता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत क्रीडा विभागाच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात […]
समाज विघातक प्रवृत्तींवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल – देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘पीएफआय’बाबत सातत्याने इनपुट्स होते. समाजात अफवा पसरवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी पैसा खर्च केला जात होता. त्यामुळे सर्व ते पुरावे हाती आल्यानंतरच केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी आणली आहे. राज्यातसुद्धा कोणत्याही समाज विघातक प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, केरळने […]
मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी, तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गृहनिर्माण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी बांद्रा येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव […]
निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज निळवंडे, कुकडी सिंचन प्रकल्प आणि गोदावरी कालवा प्रकल्पांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी […]
ई-बिल आणि व्हाऊचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : गतिमान ई-प्रशासनासाठी विकसित करण्यात आलेल्या ई- बिल आणि व्हाउचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात करण्यात आले. वित्त विभागांतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे, यांचेमार्फत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व नियोजन विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी […]
जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेबाबत चोवीस तासांत अहवाल सादर करा, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगीच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ […]
ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर (वय 44) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने एक चांगला पत्रकार, संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आशिष चांदोरकर यांनी ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या […]
सर्वांना सोबत घेऊन बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली – देवेंद्र फडणवीस
मुंबई : आपण स्वतःसाठी, परिवारासाठी तर जगतोच परंतू आपले राज्य, आपले राष्ट्र यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. समाजात जे आपल्यापेक्षा पाठीमागे आहेत त्यांना सोबत घेऊन त्या समाजाला पुढे नेण्याचे कार्य केले पाहिजे आणि हेच कार्य बंतारा समाज करीत आहे. सर्वांना सोबत घेवून बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कुरेशी […]
जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठी होते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मॉस्को : कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वत:चे जीवन प्रताडित असतानासुद्धा त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला, असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मॉस्कोत व्यक्त केले. सकाळी मॉस्को स्टेट लायब्ररीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दूतावासातील […]









