Police should use latest technology in investigation work - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

पोलिसांनी तपास कामांत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, […]

Deputy Chief Minister Devendra Fadnavis consoled the family of brave soldier Suraj Yadav
महाराष्ट्र सातारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वीर जवान सूरज यादव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

सातारा : येरवळे, ता. कराड येथील अमर जवान सूरज मधुकर यादव यांचा दिमापूर, नागालँड येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

Approval in principle for 'Maharashtra Mission Drone' project - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य शासनाचे विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. मात्र, आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यकता भासणार असून त्यासाठी ‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र ड्रोन मिशनबाबत बैठक झाली. यावेळी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, […]

Deputy Chief Minister Devendra Fadnavis handed over 15 four-wheelers to Latur Police Force
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाला १५ चारचाकी वाहने सुपूर्द

लातूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने लातूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त सुमारे १ कोटी २४ लाख रुपये निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांना हिरवी झेंडी […]

Deputy Chief Minister Devendra Fadnavis reviewed the cyber security project
महाराष्ट्र

सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई : सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, अपर पोलिस महासंचालक (आर्थिक विभाग) बिपिन सिंग, महासंचालक अर्चना त्यागी, सायबर सुरक्षा पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव, […]

Vidhansabha Nagpur
नागपूर महाराष्ट्र

विदर्भ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भ विकासाला गती देणाऱ्या योजना पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा प्रयत्न असून या अधिवेशनाच्या माध्यमातून ते साध्य झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात येईल आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत सांगितले. विधान सभेत 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना […]

Prime Minister Narendra Modi's mother Hiraben
देश

मोदीजींना घडवणाऱ्या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान, हिराबेनजी मोदी यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या शोक संदेशात म्हणतात, “हिराबा १०० वर्षे सेवाव्रती आणि संघर्षमय जीवन जगल्या. त्यातूनही त्यांनी मा. मोदीजींवर जे संस्कार […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे […]

Vidhansabha Nagpur
महाराष्ट्र

उद्योगांसाठी प्रक्रियायुक्त पाणी वापराचा विचार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : पाण्याचा पुनर्वापर केल्यास धरणांवरील अवलंबित्व कमी होईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांना ५० किमी अंतरातील महापालिकांकडून प्रक्रियायुक्त पाणी मिळाल्यास त्याचा उपयोग उद्योगांसाठी करण्यात येईल. यामुळे आरक्षित पाणी पिण्यासाठी अधिक प्रमाणात उपलब्ध होईल. त्यामुळे प्रक्रियायुक्त पाण्याच्या पुनर्वापराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य कुमार आयलानी यांनी […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकांना कालमर्यादा देण्यात येईल. मात्र दिलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण न झाल्यास इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मुंबईतील अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, योगेश सागर, अतुल भातखळकर, पराग अळवणी, सदा सरवणकर, श्रीमती यामिनी जाधव यांनी प्रश्न […]