मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास […]
टॅग: Deputy Chief Minister Ajit Pawar
शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी, खचून न जाता उमेदीने उभे राहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
औरंगाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याबाबत मदत म्हणून शासन पीक विमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या मदतीने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पुर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करावे, त्याचप्रमाणे या संकटात खचून गेलेल्यांना […]
सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे : जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे […]
खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – अजित पवार
पुणे : देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित पुरस्कारार्थी खेळाडूंच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, अभिमन्यू पवार, महाराष्ट्र खो-खो […]
सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार
मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सिंदखेडराजा तसेच राज्यातील इतर पर्यटनस्थळ विकासासाठी अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पर्यटनस्थळ विकासासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीला […]
…अन्यथा दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन […]
एसटी महामंडळाला ५०० कोटी वितरित, अजित पवार यांनी दिले होते निर्देश
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला […]
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न
पुणे : झोपडपट्टीधारकांना हक्काचे व मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त झाले पाहिजे, या करिता येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या […]
राज्यातील अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला असून ना-नफा तत्वावर अत्यंत […]
इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्यावेळी […]










