मुंबई : मुंबईतील कडवा शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रुळांवर आढळून आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला. माहितीनुसार, सुधीर मोरे गुरुवारी […]

