CWG 2022: Wrestler Bajrang Punia cruises to 2nd successive Commonwealth Games Gold
क्रीडा

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

बर्मिंगहम : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत ९-२ असा विजय साकारला आणि देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगने ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात देशासाठी सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. […]