बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी चालू असताना निवडणूक आयोगाने सांगितले आहे की ही मोजणी रात्री उशिरापर्यंत चालू राहणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०१५च्या निवडणुकीच्या तुलनेत ६३% अधिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे लावली असल्याने हा विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले, कोव्हिड-19च्या संकटामुळे मतदान केंद्रांची संख्या जवळपास ६३% नी वाढवण्यात आली होती आणि […]