नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सातपैकी एक असलेल्या एजी पेरारिवलनला बुधवारी, ९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पेरारिवलनने तीन दशकांहून अधिक काळ तुरुंगात घालवला असून सर्वोच्च न्यायालयाने त्याला पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने पेरारिवलनने 32 वर्षे तुरुंगवास भोगला असल्याचे सांगत जामीन मंजूर केला. […]

