छत्तीसगड : छत्तीसगडमधील महेंद्रगड जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद शाहनवाज याच्यासह तिघांना अटक केली आहे. महेंद्रगड अंतर्गत येणाऱ्या चिरमिरी शहरात ही घटना घडली. या शहरातील अल्पवयीन मुलीला काँग्रेस नेते शाहनवाजसह सहा जणांनी चार महिन्यांपूर्वी बिलासपूर येथील हॉटेलमध्ये जबरदस्तीने नेले होते. तेथे सर्वांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. […]

