मुंबई : पालघर जिल्हयातील खावडा अतिउच्च दाब विद्युत वाहिन्यांच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या कामामध्ये प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना तुलनात्मकरित्या जास्त असलेला मोबदला देण्यात यावा. स्थानिक प्रशासन आणि संबधित कंपन्यांनी समन्वयाने प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. पालघर जिल्ह्यातील खावडा अतिउच्च दाब विद्युत वाहिन्यांच्या उभारणीतील दर निश्चिती व अन्य विषयांच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक पार […]
टॅग: compensation
शेतकऱ्यांना हमखास भरपाई; विमा कंपन्यांवर दोष सिद्ध झाल्यास ब्लॅकलिस्ट
मुंबई : राज्य शासनाच्या नव्या पीक विमा योजनेबाबत विधानसभेत चर्चेदरम्यान कृषिमंत्री यांनी सविस्तर माहिती देताना स्पष्ट केले की, दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा कंपन्यांना शासनाकडून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे योग्य आणि हमखास नुकसान भरपाई मिळेल, याची खात्री शासन घेत असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी […]
नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप – मंत्री मकरंद जाधव – पाटील
मुंबई : राज्यात मार्च-एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद […]
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुले बाधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. यानुसार शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसान भरपाईपोटी त्यांची देय रक्कम ३१ मार्चपर्यंत दिली जाईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले. परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पीक विम्याची रक्कम मिळावी, या संदर्भात सदस्य […]
द्राक्षपिकांना शेतमालाचा दर्जा, विमासंरक्षण, नुकसान भरपाई व अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक, कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश
मुंबई : द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषीमालाच्या यादीत करण्यासंदर्भात नाबार्डसह अन्य संबंधीत यंत्रणांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिण्यात येईल. अवेळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष व फळबागांनाही प्लॅस्टीक आच्छादनांसाठी अनुदान मिळावे यासाठी राष्ट्रीय […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात 3091 पशुपालकांच्या खात्यावर 8.05 कोटी रुपये जमा
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह म्हणाले, राज्यामध्ये 31 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3204 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 172528 बाधित […]
नागपूर-मुंबई एक्सप्रेसवे : मुंबई उच्च न्यायालयाकडून भरपाईपासून वगळणारी राज्य सरकारची ‘ती’ अधिसूचना रद्द
Nagpur-Mumbai Expressway : नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्प (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) अंतर्गत बाधित झालेल्यांना मालमत्तेच्या प्रचलित बाजार मूल्यानुसार भूसंपादनासाठी भरपाई मिळण्यापासून वगळणारी महाराष्ट्र सरकारची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. 13 ऑगस्ट 2018 रोजीच्या ठरावाद्वारे राज्य सरकारने जमिनीचे बाजारमूल्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक कायद्यांतर्गत ‘रेडी रेकनर’ (सरकारने महसूल कार्यालयामार्फत अधिसूचित केलेल्या मालमत्ता व्यवहाराचा किमान दर) […]
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसान भरपाईचे पैसे मिळणार
मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवनागी मिळेल. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत […]








