मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये देण्यात आले आहेत. जखमींचा वैद्यकीय खर्च कंपनी व्यवस्थापनाने केला असून कंपनी व्यवस्थापन मृत कामगारांच्या वारसांना नोकरी देणारअसल्याची माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत दिली. […]

