मुंबई : मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. दरम्यान, मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग […]
टॅग: Chief Minister Eknath Shinde
धनगर समाजाचे प्रश्न, समस्या मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात […]
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने पूल बांधावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश […]
गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधांविना! गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार
मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मीत शहा यांचे अभिनंदन, सीए परीक्षेत पटकावला देशात पहिला क्रमांक
मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. ‘मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या होतकरू […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा
मुंबई : त्याग, समर्पणासाठी ओळखला जाणारा सण ‘बकरी ईद’ अर्थ ‘ईद-उल- अजहा’ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बकरी ईद’ कडून प्रेरणा घेऊन समाजातील बंधुता, एकमेकांप्रति आदर, एकतेची भावना वाढीस लागावी, हीच अपेक्षा. त्याग, समर्पणातूनच सशक्त अशा समाजाची उभारणी होते, त्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करूया, हीच मनोकामना आणि याच शुभेच्छा! […]
इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर : इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार […]
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची सपत्नीक महापूजा!
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत […]
केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे […]
दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित उपचार द्या; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अमरावती : मेळघाटमध्ये दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या […]









