मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील कोसंबी पेठ ता. पोंभुर्णा येथे औद्योगिक वसाहत उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या औद्योगिक वसाहतीसाठी 102.50 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून संपादनासाठी 6 कोटी 7 लाख 52 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापैकी 42.59 हेक्टर जमीन संपादनाला थेट खरेदीद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करण्यात येईल, अशी […]
टॅग: Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम २६ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचा संकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असून या अनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रीतसर परवानगी घेऊन धावपट्टीचे कार्पेटिंग,धावपट्टीच्या दुरुस्ती आणि संरक्षण भिंत उभारणे आदी कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश […]
पर्यावरण नियमांचे उल्लंघन असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल कंपनीवर कारवाई करणार – मंत्री उदय सामंत
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एम.आय.डी.सी. परिसरातील धारिवाल कंपनीने केलेल्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरण विभागाच्या अटी व शर्तीचे पालन केले आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल. या कंपनीकडून पर्यावरण नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल पॉवर प्लांटच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी […]
चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कालबद्धरित्या सोडवावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टा कंपनीच्या कोळसा खाणींमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्या प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश आज वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. एकाही प्रकल्पग्रस्तावर अन्याय होणार नाही तसेच भरपाई आणि नोकरी मिळण्यात दिरंगाई होणार नाही याची […]
चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर
मुंबई : चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ७०० ते ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून एसडीआरएफची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्याची परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु आज संध्याकाळी ४ वाजेनंतर प्राणहिता नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून,पुन्हा पूर […]
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी केंद्राची तपासणी करण्याचे आदेश
चंद्रपूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात युरिया खताची उपलब्धता आहे. मात्र खताच्या उपलब्धतेत अडचण निर्माण करत कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहे. अशा कृषी केंद्राची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिले. ब्रम्हपुरी […]






