पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. मात्र, कोर्टात तामिळनाडू आणि केरळ सरकारच्या वतीने सुनावणी पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केरळ-तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे की निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी. कारण हा पॉलिसीशी संबंधित निर्णय आहे. अशा परिस्थितीत सरकार सध्या कुठलीही बाजू घेऊ शकत नाही. […]

