मुंबई : महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयातील दालनात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री लोढा बोलत होते. […]

