कोरोनाच्या घटत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ३१ मार्चपासून सर्व कोविड निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सुरक्षित अंतर आणि फेस मास्कचा नियम कायम राहणार आहे. बुधवारी भारतात एका दिवसात कोरोनाचे 1778 नवीन रुग्ण आढळले. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 23,087 वर आली आहे. गेल्या 24 तासात 62 जणांचा मृत्यू झाला […]

