28 mountaineers trapped after avalanche hits Uttarakhand
देश

ब्रेकिंग! उत्तराखंडमधील दांडा-2 शिखरावर हिमस्खलनात 28 प्रशिक्षणार्थी अडकले, बचावकार्य सुरु

उत्तराखंड : उत्तराखंडमधील द्रौपदीच्या दांडा-2 पर्वताच्या शिखरावर झालेल्या हिमस्खलनात 28 जण अडकले असून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना घडली तेव्हा किमान 170 गिर्यारोहकांचा एक गट प्रशिक्षण घेत होता. हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना वाचवण्यासाठी डेहराडूनमधील सहस्त्रधारा हेलिपॅडवरून एसडीआरएफची टीम आता रवाना झाली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमस्खलनाची माहिती मिळताच आयएएफची कारवाई सुरु करण्यात आली. […]