सिंधुदुर्ग : मालवणमधल्या तारकर्लीत पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली आहे. या बोटीत एकूण 20 पर्यटक होते. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. इतर 16 पर्यटक सुखरूप आहेत. बोट बुडाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केलं. मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्यटक स्कुबा डायव्हिंग करून परतत होते, यावेळी हा अपघात झाला. […]

