मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अमिन पटेल यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान मुंबईतील शासकीय रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत […]

