मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत. राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. ‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे राजभवन आता केवळ […]
टॅग: लोककल्याण
गृहपयोगी संचाचे वाटप पूर्णतः नि:शुल्क – पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. यांच्या मार्फत जिल्ह्यातील 15 वितरण केंद्रांवर होत असलेल्या गृहपयोगी संचाच्या वाटपाबाबतच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात त्यांनी हे वितरण पूर्णतः निःशुल्क असून कुणाकडून पैशांची मागणी केल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार द्यावी असे आवाहन त्यांनी […]
विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू; वाळू-रेतीबाबचे धोरण जाहीर
मुंबई : विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयासह राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या पुढे नदी, खाडीपात्रातील वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन विक्री (डेपो पद्धती) ऐवजी लिलाव पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे. नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा […]



