मुंबई : राज्यातील रूग्णालयातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या उपचारात कसूर होणार नाही, त्यांचे प्राण वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुभाष देशमुख यांनी अधिवेशन […]

